Posts

Professor

  समाजमनाचे प्रतिबिंब हे शिक्षकाच्या मनोवृत्तीतून प्रकट होत असते. त्याप्रमाणे विद्यार्थी घडत असतात, आणि मग समाज घडतो. वरील व्हिडिओ क्लिप मध्ये एक विलक्षण बुद्धिमत्तेचा पण तर्कट( आपल्या मतांना चिकटून राहणारा) विद्यार्थी दिसतो. त्याच्यातले गुण-अवगुण माहित असूनही त्याच्यावर प्रेम करणारा "सक्सेना" नावाचा प्रोफेसर दिसतो. तोंडी परीक्षेत मुलाखत घेणारा सरळ मार्गी पण गुणग्राहक प्रोफेसर दिसतो. उत्तरे देणारा विद्यार्थी “latteral thinking” चा विलक्षण बुद्धिमत्तेचा, परंतु निर्भीड आहे हे लक्षात आल्यावर ज्ञानाने आलेला अस्पष्ट अहंकार हळुवारपणे बाजूला ठेवून विद्यार्थ्याला 99/100 मार्क देणारा उदारमतवादी प्रोफेसर दिसतो. त्याचवेळेस एक मार्क वाढवून मागणारा विचित्र विद्यार्थी दिसतो. त्याला एक मार्क देऊन आपलं निर्व्याज प्रेम भरभरून देणारा असा हा प्रोफेसर, सारं काही अफलातून व कल्पनातीत आहे. व्हिडिओ क्लिप मधून हास्य रसाची उधळण होत असतांना नकळतपणे एक विद्यार्थी त्याच्या भूमिकेत व एक प्रोफेसर त्याच्या भूमिकेत किती उत्तुंग ऊंचीचा अभिजात स्तर गाठू शकतात, हे कळल्यावर मन स्तिमित होवून नम्र होते, व आपल्या स